पोस्ट्स

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या...!!

इमेज
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या...!! ‘ दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो . नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो . आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात . दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो . या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे . दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात . विजयादशमीला सीमोल्लंघन , शमीपूजन , अपराजीतापूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात। या दिवशी वह्या , पुस्तके , ग्रंथ , पोथ्या , यंत्रे , शस्त्र , हत्यारे , वाद्ये , उपकरणे यांची पूजा करतात . नंतर ईशान्येला जाऊन शनी किंवा आपट्याच्या वृक्षांची पूजा करतात व त्यांची पाने तोडून ( फांद्या नव्हे ) आपल्या जवळच्या लोकांना वाटतात . या दिवशी जुनी भांडणे , तंटे विसरून चांगल्या विचारांचे आदानप्रदान करावे ही उदात्त भावना ही पाने वाटण्यामागे आहे . आपला भारत हा कृषीप्रधान देश असल्याने दसरा हा सुद्धा कृषीलोकोत्सवच आहे . पावसाळ्यात पेरणी केलेल्या श
इमेज
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं... मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सान्गतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं ! सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं ! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी : प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत ! हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं ! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं ! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं ! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं....